पुण्यातील बड्या उद्योजकाचा कारवारमध्ये निर्घुण खून ! घरात घुसून पाच जणांच्या टोळीकडून हल्ला, पत्नी गंभीर जखमी

कारवार : कारवार तालुक्यातील हणकोण येथे घरात घुसून पाच जणांच्या टोळीने हल्ला करुन विनायक काशिनाथ नाईक Vinayak Kashinath Naik (वय ५२) या पुण्यातील उद्योजकाचा निर्घुण खून करण्यात आला. या घटनेत त्यांची पत्नी वृषाली याही गंभीर जखमी झाल्या आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

विनायक नाईक हे पुण्यातील मोठे उद्योजक असून त्यांचा इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्सचा मोठा व्यवसाय आहे. ते कारवार तालुक्यातील हणकोण या मुळ गावी सातेरी देवीच्या उत्सवानिमित्त गेले होते. हा उत्सव १० ते १६ सप्टेबर दरम्यान होता. त्यानंतर आईच्या श्राद्ध करायचे असल्याने ते थांबले होते. रविवारी ते पुण्यात परत जाण्यासाठी निघणार होते. परत जाण्याची तयारी करण्यासाठी ते लवकरच उठले होते. पहाटेच्या सुमारास कारमधून पाच जण आले. ते घरात शिरले. त्यांनी विनायक नाईक यांच्यावर चाकू, लोखंडी रॉड व तलवारीने निर्घुण हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला.

यावेळी त्यांची पत्नी वृषाली यांनी हल्लेखोरांचा प्रतिकार केला. तेव्हा त्यांनी वृषाली यांच्यावरही वार केले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच कारवार पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक के. नारायण यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. विनायक नाईक यांच्यावर हल्ला करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सदाशिवगड पोलीस ठाण्यात (Sadashivgad Police Station) खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी पथक स्थापन करण्यात आले आहे. Latest News In Maharashtra and Pune District