पुणे : मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या एका २१ वर्षाच्या तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. Latest News In Maharashtra and Pune District
बोपदेव घाटात मित्रांसोबत दोन दिवसांपूर्वी फिरायला गेलेल्या एका तरुणीचे कारमधून एका तरुणाने अपहरण केले. तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा गाडीत विनयभंग करुन आरोपी तरुणीला सोडून पळून गेला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा बलात्कारीच धक्कादायक घटना समोर आली आहे.संबंधित पीडित तरुणी ही मुळची सुरत येथील राहणारी असून तिचा मित्र जळगाव येथील राहणारा आहे. दोघे पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. गुरुवारी रात्री हे दोघे दुचाकीवरुन बोपदेव घाटात रात्री उशिरा फिरायला गेले होते. त्यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिघे जण तेथे आले. त्यांनी तरुणीवर सामुहिक बलात्कार केला. या घटनेमुळे घाबरलेल्या पीडित मुलीस तिच्या मित्राने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे तिची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या बाबत रुग्णालयातून कोंढवा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती झाली. त्यानंतर शुक्रवारी पहाटे ५ वाजता आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Latest News In Maharashtra and Pune District
याबाबत सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, जेथे ही घटना घडली तो भाग एकाकी आणि काळोखात आहे. पहाटे ५ वाजता पोलिसांना याची माहिती झाली. आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची १० पथके तपासासाठी रवाना करण्यात आली आहेत. कोंढवा पोलिसांचे तपास पथकही शोध घेत असल्याचे सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.
वरील इसम हे कोंढवा पोलीस स्टेशन गु रजि नंबर 1122/2024 या गुन्ह्यातील (बोपदेव घाट - सामूहिक बलात्कार प्रकरण) संशयित आरोपींचे स्केच असून त्यांचे बाबत काही माहिती मिळाल्यास खालील नंबर वर त्वरित संपर्क साधावा.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन श्री विनय पाटणकर मो नं 8691999689
पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 श्री. युवराज हांडे मो नं. 8275200947 /9307545045
नियंत्रण कक्ष पुणे शहर 020-26122880
यावर त्वरित संपर्क साधावा Latest News In Maharashtra and Pune District
0 टिप्पण्या