पुण्यातल्या रस्त्यावरील खड्ड्यांची राष्ट्रपतींनी घेतली दखल; प्रशासकीय वर्तुळात खळबळ; पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी खड्डे बुजवावेत, महापालिकेला पत्र

पुणे: Droupadi Murmu On Pune Potholes | शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांवरून देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडूनच नाराजी व्यक्त झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २ आणि ३ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु पुणे दौऱ्यावर होत्या. पुण्यातील राजभवनला (Rajbhavan Pune) त्यांचा मुक्काम होता. तिथून कार्यक्रमांसाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जातांना राष्ट्रपतींच्या ताफ्यातील वाहनांना पुण्यातील खड्ड्यांचा सामना करावा लागला. राष्ट्रपती कार्यालयाने ही नाराजी पुणे पोलिसांना (Pune Police) कळवली असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान आता २६ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात (PM Modi Pune Visit) येणार असल्याने रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत यासाठी पुणे पोलिसांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे. राष्ट्रपती कार्यालयाने व्यक्त केलेली नाराजी पाहता पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी विनंती महापालिकेला करण्यात आली आहे. (Pune Police Letter To PMC Regarding Potholes) Latest News In Maharashtra and Pune District

पावसाळ्यात शहरातील रस्त्यांना खड्डे पडून चाळण झालेली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडून वाहनचालक त्रस्त झाले आहेत. गणेश खिंड रस्त्यावर शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो आणि उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. याठिकाणी खड्डे पडून वाहतूक कोंडी होत असल्याने महापालिका (Pune Municipal Corporation - PMC), पीएमआरडीए (PMRDA), वाहतूक पोलिस (Pune Traffic Police) यांच्या संयुक्त बैठका झाल्या, उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले. तरीही रस्त्याची स्थिती सुधारलेली दिसत नाही. Latest News In Maharashtra and Pune District