माझ्याशी रिलेशन ठेवले नाहीस तर तुझे व 'रोहन'चे तसले फोटो घरच्यांना पाठविल ! तरुणीवर वारंवार बलात्कार

 माझ्याशी रिलेशन ठेवले नाहीस तर तुझे व 'रोहन'चे तसले फोटो घरच्यांना पाठविल ! तरुणीवर वारंवार बलात्कार

पुणे : माझ्याशी रिलेशन ठेवले नाहीस तर तुझे व रोहनचे फोटो घरच्यांना पाठविल, अशी धमकी देऊन एकाने तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश मोतीराम गायकर (रा. पाचघर, पो. ओतूर, ता. जुन्नर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२३ पासून आतापर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांना फोन करुन रिलेशनशीपची मागणी केली. फिर्यादी यांनी नकार दिल्यावर त्याने फिर्यादींना अश्लिल शिवीगाळ केली. त्यानंतर वारंवार व्हॉटसअ‍ॅप मेसेज करुन फिर्यादीस तुझे व रोहनचे काही फोटो माझ्याकडे आहेत. तसेच रोहनने मला तुझ्याविषयी सर्व माहिती सांगितली आहे. जर तू माझ्याशी रिलेशन ठेवले नाहीस तर मी तुझे व रोहनचे फोटो तुझ्या घरच्यांना पाठविल, अशी धमकी दिली. त्याला घाबरुन फिर्यादी तो म्हणेल, असे वागू लागल्या. त्याने फिर्यादीला वेगवेगळ्या लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्याच्या त्रासाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करीत आहेत.  Latest News In Maharashtra and Pune District

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या